डॉ. हेडगेवार एक आदर्श व्यक्तिमत्व

सुरवातीला मी ऐकलं होत की संघ समजून घ्यायचा असेल तर प्रथम डॉक्टर हेडगेवार यांचे जीवनचरित्र समजून घ्यायला पाहिजे . त्याप्रमाणे अभ्यास केल्यावर असं लक्ष्यात आल की संघ म्हणजे डॉक्टर अन् डॉ. म्हणजे संघ हे एक समीकरण आहे. आज प्रत्यक्षात डॉक्टरांना पाहिले जरी नसले तरी डॉक्टरांनी जे काम केले आहे ते आपण सर्वजण पाहत आहोतच. डॉ. हेडगेवारांनी संघाला नुसते जीवनदान दिले नाही तर अक्षरशः आपल्या रक्ताचे पाणी करुन वाढवले आहे. *डॉक्टरांच्या जीवनातील काही प्रसंग* केशव मध्ये बाल पणापासून प्रखर देशभक्ती होती. एकदा शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. डॉक्टरांच्या अशा अनेक पैलूंचा माझ्यासारख्या असंख्य स्वयंसेवकांवर परिणाम झाला. भारत गुलामगिरीत जगत असताना, लोकांना हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटत होती, "गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका" अशा मानसिक गुलामगिरीने पचाढलेल्या लोकांना ...