*निकाल एक भिती*

* निकाल *

सर्व प्रथम सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा

मुलांनो निकाल काही पण येऊद्या टेन्शन घेवू नका. निकाल ही आपली अंतिम परीक्षा नाही. निकाला तुमचे भविष्य नाही ठरवत आहे.आपण जी मेहनत केली ती जर प्रामाणिक असेल तर निकाल नक्कीच चांगला येईल. कदाचित आपल्याला अपेक्षित मार्क्स नाही मिळतील, जरी नाही मिळाली तर बिलकुल घाबरु नका. 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सचिन तेंदुलकर बारावी नापास आहे पण आज क्रिकेटचा देव बोलतात, शाहरुख़ खान, अभिताभ बच्चन, बिल गेट्स, अब्राहम लिंकन अशी अनेक उदाहरण देता येतील.

येथून पुढे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जे काही कराल ते जास्तीत जास्त मन लावून करा. यश अपयश हा निर्सगाचा नियम आहे.

या नंतर निर्णय घेताना तुम्हाला खरचं जे क्षेत्र जास्त आवडते ते क्षेत्र निवडा, अन त्यात तुमचं सर्वस्व द्या तुम्हाला तुमच्या यशापासून कोणी रोखू शकत नाही.

पालकांनी सुद्धा नाराज न होता आपल्या मुलाला/मुलीला धीर ध्या, रागावू नका. त्यांना जे क्षेत्र आवडतं ते निवडण्यास परवानगी द्या. मुलांवर कोणतेही क्षेत्र लादू नका, कारण त्यात आपला व आपल्या पाल्यांच नूकसान आहे.

बिल गेट्स नेहमी सांगतात मी कोणत्याही विद्यापीठात पहिला आलो नाही पण आज मी जगातील एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. मार्क्स मिळवण्यासाठी शिकू नका तर ज्ञान मिळवण्यासाठी शिका.

पुन्हा एकदा आपणांस सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

- दत्तात्रय शिंदे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. हेडगेवार एक आदर्श व्यक्तिमत्व

Security Quiz MCQ Questions And Answers: 50+ Questions And Answers

बारावी नंतर आता पुढे काय?