भारतातील महिला दिन

*महिला दिन* महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. पण भारतात आजकाल सोशल मीडियावर लोक खूप मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करताना दिसतात. कदाचित या दिनाचे महत्त्व, पाश्वभूमी माहितही नसेल, पण एकाने पोस्ट केली की सगळे जण जागे होतात. मग सोशल मीडियावर ट्रेंड चालू होतो वेगवेगळे फोटो टाकून शुभेच्छा. यात अजून एक गोष्ट खूप चालते ती म्हणजे उच्च वर्णीय असेल तर तो त्यांच्या समाजातील महिलांचे फोटो टाकणार, कोणी दुसऱ्या समाजातील असेल तर ते त्यांच्या समाजातील फोटो टाकणार. मग महिला दिनाचे महत्त्व राहते बाजूला अन आप आपसातील मतभेद चालू होतात. त्याचप्रमाणे इथल्या काही स्त्रियांना माहिती ही ...