या कणाकणातून दिव्य तेज प्रकटेल...

 या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल

हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल ॥धृ॥


श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले

श्रेष्ठत्व जगाने मान्य तयांचे केले ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील ॥१॥


जाती पन्थ भाषा नको वृथा अभिमान भेदांच्या भिंती पडोत सर्व जळुन

निद्रेतुन व्हावा जागा हिन्दुस्थान ते तेज जगाला निःसंशय दिपवील ॥२॥


आसाम असो पंजाब असो बंगाल तो महराष्ट्र वा कर्नाटक तामिळ

हा अखन्ड भारत परि आसेतु हिमाचल विविधतेतुनि एकता इथे प्रकटेल ॥३॥


हा समाज आपुला ध्येयापासुनि ढळला हिन्दूच हिन्दुच्या विरोधात उठलेला

परकीय शक्तिचा स्वार्थी हस्तक बनला कष्टाने आमुच्या देशभक्त होइल ॥४॥


राष्ट्राचा करण्या घात कुणी धजतील परकीय शक्तिला साथ कुणी देतील

बलदण्ड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देतील हा संघ शक्तिचा साक्षात्कार घडेल ॥५॥



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. हेडगेवार एक आदर्श व्यक्तिमत्व

Security Quiz MCQ Questions And Answers: 50+ Questions And Answers

बारावी नंतर आता पुढे काय?