डॉ. हेडगेवार एक आदर्श व्यक्तिमत्व
सुरवातीला मी ऐकलं होत की संघ समजून घ्यायचा असेल तर प्रथम डॉक्टर हेडगेवार यांचे जीवनचरित्र समजून घ्यायला पाहिजे . त्याप्रमाणे अभ्यास केल्यावर असं लक्ष्यात आल की संघ म्हणजे डॉक्टर अन् डॉ. म्हणजे संघ हे एक समीकरण आहे. आज प्रत्यक्षात डॉक्टरांना पाहिले जरी नसले तरी डॉक्टरांनी जे काम केले आहे ते आपण सर्वजण पाहत आहोतच. डॉ. हेडगेवारांनी संघाला नुसते जीवनदान दिले नाही तर अक्षरशः आपल्या रक्ताचे पाणी करुन वाढवले आहे.
*डॉक्टरांच्या जीवनातील काही प्रसंग*
केशव मध्ये बाल पणापासून प्रखर देशभक्ती होती. एकदा शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. डॉक्टरांच्या अशा अनेक पैलूंचा माझ्यासारख्या असंख्य स्वयंसेवकांवर परिणाम झाला.
भारत गुलामगिरीत जगत असताना, लोकांना हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटत होती, "गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका" अशा मानसिक गुलामगिरीने पचाढलेल्या लोकांना त्या वेळी डॉक्टर ठामपणे ओरडून सांगत होते, की होय मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतोय हे हिंदू राष्ट्र आहे. डॉक्टरांनी लोकांना नुसते सल्ले दिले नाहीत तर लोकांना ते पटवून दिले.
"हिंदू संस्कृती ही हिंदुस्थान चा प्राण आहे". त्यामुळे हे स्पष्ट आहे की जर हिंदुस्थानची रक्षा करायची असेल तर प्रथमतः आपल्याला हिंदू संस्कृतीचे जतन करायला हवे. अन् हे जर करायचं असेल तर आपल्याला एक हिंदू संघटन आवश्यक आहे. कारण ही ताकत फक्त हिंदू संघटनेतून च येऊ शकते. जो पर्यंत हिंदू संस्कृतीचे जतन होत नाही या देशातील सर्व समस्या संपत नाहीत, हा देश जो पर्यंत सर्वोच्च स्थानी येत नाही तोपर्यंत हा देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असे म्हणता येणार नाही. याच धर्तीवर डॉक्टरांनी १९२५ साली स्थापन केलेल्या एका छोट्या संघाचं आज आपण विराट रूप पाहत आहोत. संघातील प्रत्येक कार्यक्रमाचा पै अन पैचा हिशोब ठेवण्याचा आग्रह असो, समाजातील सर्व स्तरातील लोकांशी चांगले संबंध ठेवणे असो, सामाजिक समरसता कृतीत आणण्याचा प्रयत्न असो, हिंदूचे व हिंदू संस्कृतीचे रक्षण त्या साठी संघटन, परधर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात घेण्यासाठी पुढाकार वा स्वदेशी वस्तूंची विक्री असो वां प्रसार सर्व स्तरावरील सखोल अभ्यास असलेले डॉक्टर मीच काय माझ्यासारखा कोणीही तरुण डॉक्टरांच्या नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.
शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत करोडो कार्यकर्ते देशभर काम करत आहेत, हजारों स्वयंसेवक आज प्रचारक म्हणून आपल जीवन संघ कार्यासाठी वाहत आहेत. देशात कोणतीही अडचण असो आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वयंसेवक काम करताना दिसतात. "परंम् वैभवम नेतुमेतत्वस्वराष्ट्रं" म्हणजे देशाला परम वैभवाला घेऊन जाण्यासाठी संघ कार्य करतं आहे.
आज एखादं कोणताही छोटंसं काम असो लोक सगळीकडे त्याची प्रसिद्धी वाहवा करतं बसतात. पण संघात असं काही आपणाला पाहायला मिळत नाही याचं कारणच डॉ. हेडगेवारांनी सुरवातीला स्पष्ट केले होते.
मला एक गोष्ट आठवते की सर्वजण गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त एकत्र आले होते, सर्वांना वाटले की डॉक्टर खुर्चीवर बसतील मग एक एक जण येऊन डॉक्टरांना नमस्कार करेल पण असं काही घडलच नाही. समोर भगवा ध्वज लागला व सर्वांनी भगव्या ध्वजाला प्रणाम केला. डॉ. सर्वांना सांगितले की संघामध्ये कोणीही व्यक्ती गुरू स्थानी असणार नाही, कारण व्यक्ती ही काही काळानंतर बदलू शकते किंवा चुकू शकते म्हणून हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज हाच आपला गुरू. मला एका पद्याची पंक्ती आठवते, 'भगवा झेंडा गुरु आपुला, रोज तयाला नमन करु, परिश्रमाने पराक्रमाने, ध्येय आपुले साध्य करू' !!
डॉक्टरांनी केलेलं कष्ट जर आपण पाहिलं तर आपल्या लक्ष्यात येईल की डॉक्टरांनी अवघ्या १५ वर्षांत देशभरातील सर्व प्रांतात संघाचं काम उभे केले होते. आज असं एकही क्षेत्र नाही जिथे संघाचा कार्यकर्ता काम करत नाही. डॉक्टरांच नेतृत्व इतकं विलक्षण होत की त्या काळी वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटायला नागपूरला येत होते. याच्यामधेच गांधीजी एकदा वर्ध्याच्या शिबिरात डॉक्टरांना भेटले व त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी समरसतेच अनोखं रूप पाहिलं व डॉक्टरांच कौतुकही केलं.
व्यक्तिला त्याच्या जीवनात त्याच्या कर्मामुळे यश मिळते आणि मृत्यूनंतर ते फक्त इतिहास बनून राहतात. परंतु डॉ. हेडगेवार वर्तमान व भविष्याशी जोडले गेले आहेत, आणि हेच एकमेव कारण आहे की त्यांची प्रसिद्धी मृत्युनंतर जास्त होत गेली. त्यांची अखंड हिंदुस्थानबद्दल असलेली संकल्पना मला कधी संघाचा एक स्वयंसेवक बनवून गेली समजलच नाही.
- दत्तात्रय शिंदे
#Dr Hedgewar डॉ. हेडगेवार
टिप्पण्या
अजून जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली