बारावी नंतर आता पुढे काय?

बारावी नंतर आता पुढे काय?

सर्व प्रथम पास झालेल्या सर्व विद्याथ्यांचे खूप खूप अभिनंदन! 


आत्ताच बारावीचा निकाल लागला आशा आहे सर्वांना चांगले मार्क्स पडले असतील पण एक प्रश्न आहेच पुढे काय? 

कदाचित काही मुलांचे ठरले पण असेल तसे मार्क्स पण मिळाले असतील, पण काहींना अपेक्षा नुसार मार्क्स मिळाले नसतील, त्यांना मी एकच सांगेन तुम्ही मेहनत खूप केली होती पण थोड्या फार चुका झाल्या असतील म्हणून खचून जावू नका. 

काहींना इजिंनिअर, ड्रॉक्टर बनायच स्वप्न असेल, पण थोड्या फार मार्क्स ने तुम्हाला चांगले कॉलेज नाही मिळणार म्हणून खचून जावू नका. ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा, काही जण JEE/ NEET परत द्यायचा विचार करत असतील पण परत देवून पण नाही झाले तर तुमचे वर्ष फुकट झायला नको. काहींना परत मिळतील ही चांगले मार्क्स तरी एकदा चांगला विचार करावा.

जे कॉमर्स चे असतील ते B.com सोबत CA/CS/ Banking etc. या क्षेत्राकडे वळतील.

पण हे झाले चांगले मार्क्स मिळाले त्यांचे बाकींच्याच काय? मग त्यात सायन्स, कॉमर्स, आर्ट्स वाले असतील, त्यांना एकच सांगेन स्पर्धा खूप मोठी आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडताना पुढचा विचार करुन निवडा, कोणी हे कर ते कर म्हणून सांगेन पण तुम्हाला खरंच ते क्षेत्र आवडतं का हे पण विचारात घ्या. 

For science: B.sc/BCS/BBA/BCA/B.Tech/B. Architecture/Aggri/BJMC( Mass communication)/BMS

For Arts: BA for different subject/BFA/B.Design/B.Lib( Library Arts)/Travel and tourism/BA journalism/BSW/BHM

For commerce: B.com/ BBA/ CA/ CS/BCA/BMS/CMA/CFA/Bachelor in Economics

B.sc/ B.com/ BA/ BCS/BCA कोणतेही क्षेत्र कमी नाही यातून पुढे Master करू शकता. या क्षेत्रातून सुद्धा तुम्ही तुमचं करियर घडवू शकता, स्पर्धा परिक्षा हा एक उत्तम पर्याय आहे, Banking, शिक्षक, मेडिकल, Diploma, अशी खूप काही क्षेत्र आहेत. या पेक्षा ही Photoshoot/BTA( Acting) अशा प्रकारचे खूप सारे पर्याय आहेत ज्या कड़े आपली मुले- मुली जात नाहीत.

फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे काही कराल त्यात तुमचा 100 टक्के द्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल! 

तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

- दत्तात्रय शिंदे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. हेडगेवार एक आदर्श व्यक्तिमत्व

Security Quiz MCQ Questions And Answers: 50+ Questions And Answers