भारतातील महिला दिन
*महिला दिन*
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
पण भारतात आजकाल सोशल मीडियावर लोक खूप मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करताना दिसतात. कदाचित या दिनाचे महत्त्व, पाश्वभूमी माहितही नसेल, पण एकाने पोस्ट केली की सगळे जण जागे होतात. मग सोशल मीडियावर ट्रेंड चालू होतो वेगवेगळे फोटो टाकून शुभेच्छा. यात अजून एक गोष्ट खूप चालते ती म्हणजे उच्च वर्णीय असेल तर तो त्यांच्या समाजातील महिलांचे फोटो टाकणार, कोणी दुसऱ्या समाजातील असेल तर ते त्यांच्या समाजातील फोटो टाकणार. मग महिला दिनाचे महत्त्व राहते बाजूला अन आप आपसातील मतभेद चालू होतात. त्याचप्रमाणे इथल्या काही स्त्रियांना माहिती ही नसेल आज जे आपण एवढे स्वाभिमानाने जगतोय, हा अधिकार जो आपणाला प्राप्त झाला हा मिळवून देणाऱ्या महिला आहेत तरी कोण?
नक्कीच महिलांचा सन्मान झाला पाहिजे पण तो फक्त ८ मार्च पुरता नाही तर तो प्रत्येक दिवशी झाला पाहिजे. इथे अस म्हणतात कि जहां एक नारी की पूजा होती है, वहां देवता निवास करते हैं। एकिकडे चर्चा होते महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण, तर दुसरीकडे स्रियांवरील वाढते अत्याचार मग महिला सशक्तीकरण, सबलीकरण हे मुद्दे फक्त चर्चेपुरते होऊन जातात. मग प्रश्न पडतो खरचं महिलांना अजूनही हवे तसे स्वातंत्र्य आहे का❓शहरी भागात असेलही पण ग्रामीण भागात अजूनही हवे तसे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले नाही. मग समाज या साठी प्रयत्न करतो का❓असे समाजाने स्वतःच स्वतःला विचारावे. ज्या दिवशी समाज या सर्व समस्यांवर तोडगा काढेल, त्यासाठी प्रयत्न करेल तेव्हाच कुठे खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल असे म्हणता येईल.....
#महिला दिन #women's day
टिप्पण्या