अंतिम वर्ष परीक्षा आणि राजकारण!

अंतिम वर्ष परीक्षा आणि राजकारण! या वर्षांच्या सुरवातीला करोना नावाचं संकट आले अन या मध्ये सर्वांचे च नूकसान झाले. या मध्ये सर्वात जास्त भरडला गेला तो म्हणजे विद्यार्थी, विशेषता अंतिम वर्षाचा विद्यार्थी. कारण एक तर तो नोकरीच्या शोधात होता, वरून हे संकट आणि दुसरे परिक्षा. या मध्येच सरकारने अजून एक ठिणगी टाकली की अंतिम वर्ष सोडून बाकी सर्वांच्या परीक्षा होणार नाहीत. मग अंतिम वर्षाचा विद्यार्थी म्हणू लागला की आम्ही काय पाप केले की आमच्या परीक्षा होणार? सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघून आपला राजकीय डाव साधन्याचा प्रयत्न केला. पण अगोदरच ५ महिन्या पूर्वी सत्ता गेलेला विरोधी पक्ष! यांना यात यश न मिळू देण्यासाठी धडपड करू लागला, मग ते आपल्या केंद्रातील सत्तेचा उपयोग करु लागले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन शिक्षणमंत्री ठाम! नाही म्हणजे नाही! आता कुठे विद्यार्थी आशेचा श्वास घेत होता, तोपर्यंत विरोधी पक्ष व त्यांच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या, रोज डिबेट चालू झाल्या पण या डिबेट ला अंतिम वर्षाचा विद्यार्थी कुठेच दिसला नाही, दिसले ते संघटनांचे कार्यकर्...