एक विचार

एक विचार

 सध्या ची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिति इतकी वाईट होत चालली आहे की, विकासाची चर्चा न करता, महापुरुषांचे विचार आत्मसात न करता, प्रत्येक जण काही ना काहीतरी वादाचा विषय करत चालला आहे. महापुरुषांचा सन्मान करता येत नसेल तर कमीत कमी अवमान तरी करू नका. बोलायचं असतं एक, अर्थ होतो दुसराच, अन सांगणारा सांगतो तिसराच. कारण लोकांना अर्थ समजुन घेण्यापेक्षा चुकीचा अर्थ कसा निघेल याचीच लोक वाट पाहत असतात. सध्या तर मालिकाच सुरू झाली आहे. एक एक जण महापुरुष, संत यांचे नाव घेऊन त्यांचा अवमान आणि येणाऱ्या पिढीची पण माथी भडकवण्याचे काम करीत चालला आहे. एकीकडे भारत G20 च प्रतिनिधीत्व करताना दिसतोय, म्हणजेच जगाचं प्रतिनिधीत्व करताना दिसतोय, आज जग भारताकडे एका आशेने बघत आहे. सर्वच क्षेत्रात भारताची ताकद आपल्याला पाहायला मिळतेय. कालचच उदाहरण पाहिल तर लक्षात येइल. चिनी सैन्य भारतात घुसत असताना भारतीय सैन्यांनी आपली नव्या भारताची ताकद त्यांना दाखवून दिली. पण राज्यांतील परिस्थिति पाहताना दुःख होत. प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आहे. काल पुण्यात छत्रपती शिवरायांच्या समर्थनात मोर्चा निघाला. मोर्चात काही मुस्लिम संघटना पण सामील होत्या. हे चांगलं की शिवरायांच्या समर्थनात आलात. मग शिवरायांच्या समर्थनात आलात तर त्यांच्या स्वराज्याचाच ध्वज घेऊन यायला हवं होतं पण तूम्ही नाचवलात हिरवा. तुम्ही समर्थन करायला आला होता की तुमचा एजेंडा राबवायला आला होतात. लोक संधीचा कसा उपयोग करुन घेतात हे कालच्या मोर्चात दिसले. पण समाज म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी याच्यावर विचार करायला हवा. कारण ज्यांना असं वाटतं ना की मला काय फरक पडत नाही. फरक नक्की पडतो, उदाहरणं च द्याच झाल तर शिवरायांचच घ्या, कारण शिवरांयांचे वडील शहाजीराजे आदिलशाहीत सरदार होतेच, कदाचित त्यांच्या नंतर शिवराय झाले असते. पण नाही!!! कारण त्या जिजाऊ मातेला माहित होत की हे जुलमी शासन मुघल शासन आहे. हे क्रूर मुघल काल येऊन या आपल्या प्रजेवर राज्य, हुकूमत करतात. आणि गुलामीत जगणे ही आपली हिंदू संस्कृतीच नाही. म्हणूनच लहान पणापासून च जिजाऊंनी शिवरायांना राम, कृष्ण यांच्या गोष्टी सांगत शिवरायांना मनाने इतके भक्कम बनवत गेल्या की शिवरायांनाच आपल्या स्वराज्याची स्थापना करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली. आणि त्यांनी ती बोलुन पण दाखवली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा! अन् प्रत्येक्षात शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण पण केलं. म्हणूनच आपल्या विचार करण्याने नक्कीच फरक पडतो!!

#स्वराज्य 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. हेडगेवार एक आदर्श व्यक्तिमत्व

Security Quiz MCQ Questions And Answers: 50+ Questions And Answers

बारावी नंतर आता पुढे काय?