आदर्श शिक्षक
आदर्श शिक्षक
एकदा शाळेतील एका विद्यार्थी याचे घड्याळ चोरी होते. मग तो शिक्षकाकडे तक्रार करतो. कोणीही खरे बोलायला तयार होत नाही. मग शिक्षक सर्व मुलांना डोळ्याला पट्टी बांधायला लावतात व सर्व मुलांना चेक करतात. घड्याळ सापडते व सर ते घड्याळ त्या मुलाला देतात पण कोणी घेतले होते ते सांगत नाहीत.
खुप वर्षानंतर एक पोलीस अधिकारी सरांना भेटायला येतो व त्याच नाव सांगतो. तो पोलीस अधिकारी सरांना विचारतो मी घड्याळ चोरी केली होती, तेव्हा तुम्ही मला शिक्षा का केली नाही. तेव्हा सर जे उत्तर देतात ते खूप समर्पक आहे. सर त्या मुलाला सांगतात तूम्ही ज्या वेळी डोळ्याला पट्टी बांधली तेव्हा मी पण एक पट्टी माझ्या डोळ्याला बांधली होती. कारण मला माझ्या विद्यार्थाला माझ्या नजरेतून कमी करायचं नव्हतं. हे ऐकून त्या पोलीस अधिकारी च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. एक आदर्श शिक्षक कसा असावा याच आदर्श उदाहरण!
#Teachersday
#शिक्षक दिन
#motivational story
टिप्पण्या