पोस्ट्स

अंतिम वर्ष परीक्षा आणि राजकारण!

इमेज
अंतिम वर्ष परीक्षा आणि राजकारण!       या वर्षांच्या सुरवातीला करोना नावाचं संकट आले अन या मध्ये सर्वांचे च नूकसान झाले. या मध्ये सर्वात जास्त भरडला गेला तो म्हणजे विद्यार्थी, विशेषता अंतिम वर्षाचा विद्यार्थी. कारण एक तर तो नोकरीच्या शोधात होता, वरून हे संकट आणि दुसरे परिक्षा. या मध्येच सरकारने अजून एक ठिणगी टाकली की अंतिम वर्ष सोडून बाकी सर्वांच्या परीक्षा होणार नाहीत. मग अंतिम वर्षाचा विद्यार्थी म्हणू लागला की आम्ही काय पाप केले की आमच्या परीक्षा होणार? सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघून आपला राजकीय डाव साधन्याचा प्रयत्न केला. पण अगोदरच ५ महिन्या पूर्वी सत्ता गेलेला विरोधी पक्ष! यांना यात यश न मिळू देण्यासाठी धडपड करू लागला, मग ते आपल्या केंद्रातील सत्तेचा उपयोग करु लागले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन शिक्षणमंत्री ठाम! नाही म्हणजे नाही!  आता कुठे विद्यार्थी आशेचा श्वास घेत होता, तोपर्यंत विरोधी पक्ष व त्यांच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या, रोज डिबेट चालू झाल्या पण या डिबेट ला अंतिम वर्षाचा विद्यार्थी कुठेच दिसला नाही, दिसले ते संघटनांचे कार्यकर्...

एक विचार

एक विचार  सध्या ची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिति इतकी वाईट होत चालली आहे की, विकासाची चर्चा न करता, महापुरुषांचे विचार आत्मसात न करता, प्रत्येक जण काही ना काहीतरी वादाचा विषय करत चालला आहे. महापुरुषांचा सन्मान करता येत नसेल तर कमीत कमी अवमान तरी करू नका. बोलायचं असतं एक, अर्थ होतो दुसराच, अन सांगणारा सांगतो तिसराच. कारण लोकांना अर्थ समजुन घेण्यापेक्षा चुकीचा अर्थ कसा निघेल याचीच लोक वाट पाहत असतात. सध्या तर मालिकाच सुरू झाली आहे. एक एक जण महापुरुष, संत यांचे नाव घेऊन त्यांचा अवमान आणि येणाऱ्या पिढीची पण माथी भडकवण्याचे काम करीत चालला आहे. एकीकडे भारत G20 च प्रतिनिधीत्व करताना दिसतोय, म्हणजेच जगाचं प्रतिनिधीत्व करताना दिसतोय, आज जग भारताकडे एका आशेने बघत आहे. सर्वच क्षेत्रात भारताची ताकद आपल्याला पाहायला मिळतेय. कालचच उदाहरण पाहिल तर लक्षात येइल. चिनी सैन्य भारतात घुसत असताना भारतीय सैन्यांनी आपली नव्या भारताची ताकद त्यांना दाखवून दिली. पण राज्यांतील परिस्थिति पाहताना दुःख होत. प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आहे. काल पुण्यात छत्रपती शिवरायांच्या समर्थनात मोर्च...

आदर्श शिक्षक

इमेज
 आदर्श शिक्षक एकदा शाळेतील एका विद्यार्थी याचे घड्याळ चोरी होते. मग तो शिक्षकाकडे तक्रार करतो. कोणीही खरे बोलायला तयार होत नाही. मग शिक्षक सर्व मुलांना डोळ्याला पट्टी बांधायला लावतात व सर्व मुलांना चेक करतात. घड्याळ सापडते व सर ते घड्याळ त्या मुलाला देतात पण कोणी घेतले होते ते सांगत नाहीत.  खुप वर्षानंतर एक पोलीस अधिकारी सरांना भेटायला येतो व त्याच नाव सांगतो. तो पोलीस अधिकारी सरांना विचारतो मी घड्याळ चोरी केली होती, तेव्हा तुम्ही मला शिक्षा का केली नाही. तेव्हा सर जे उत्तर देतात ते खूप समर्पक आहे. सर त्या मुलाला सांगतात तूम्ही ज्या वेळी डोळ्याला पट्टी बांधली तेव्हा मी पण एक पट्टी माझ्या डोळ्याला बांधली होती. कारण मला माझ्या विद्यार्थाला माझ्या नजरेतून कमी करायचं नव्हतं. हे ऐकून त्या पोलीस अधिकारी च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. एक आदर्श शिक्षक कसा असावा याच आदर्श उदाहरण! #Teachersday #शिक्षक दिन #motivational story 

डॉ. हेडगेवार एक आदर्श व्यक्तिमत्व

इमेज
     सुरवातीला मी ऐकलं होत की संघ समजून घ्यायचा असेल तर प्रथम डॉक्टर हेडगेवार यांचे जीवनचरित्र समजून घ्यायला पाहिजे . त्याप्रमाणे अभ्यास केल्यावर असं लक्ष्यात आल की संघ म्हणजे डॉक्टर अन् डॉ. म्हणजे संघ हे एक समीकरण आहे. आज प्रत्यक्षात डॉक्टरांना पाहिले जरी नसले तरी डॉक्टरांनी जे काम केले आहे ते आपण सर्वजण पाहत आहोतच. डॉ. हेडगेवारांनी संघाला नुसते जीवनदान दिले नाही तर अक्षरशः आपल्या रक्ताचे पाणी करुन वाढवले आहे.  *डॉक्टरांच्या जीवनातील काही प्रसंग*      केशव मध्ये बाल पणापासून प्रखर देशभक्ती होती. एकदा शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. डॉक्टरांच्या अशा अनेक पैलूंचा माझ्यासारख्या असंख्य स्वयंसेवकांवर परिणाम झाला.      भारत गुलामगिरीत जगत असताना, लोकांना हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटत होती, "गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका" अशा मानसिक गुलामगिरीने पचाढलेल्या लोकांना ...

भारतातील महिला दिन

इमेज
*महिला दिन*      महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.       पण भारतात आजकाल सोशल मीडियावर लोक खूप मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करताना दिसतात. कदाचित या दिनाचे महत्त्व, पाश्वभूमी माहितही नसेल, पण एकाने पोस्ट केली की सगळे जण जागे होतात. मग सोशल मीडियावर ट्रेंड चालू होतो वेगवेगळे फोटो टाकून शुभेच्छा. यात अजून एक गोष्ट खूप चालते ती म्हणजे उच्च वर्णीय असेल तर तो त्यांच्या समाजातील महिलांचे फोटो टाकणार, कोणी दुसऱ्या समाजातील असेल तर ते त्यांच्या समाजातील फोटो टाकणार. मग महिला दिनाचे महत्त्व राहते बाजूला अन आप आपसातील मतभेद चालू होतात. त्याचप्रमाणे इथल्या काही स्त्रियांना माहिती ही ...

या कणाकणातून दिव्य तेज प्रकटेल...

इमेज
 या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल ॥धृ॥ श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले श्रेष्ठत्व जगाने मान्य तयांचे केले ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील ॥१॥ जाती पन्थ भाषा नको वृथा अभिमान भेदांच्या भिंती पडोत सर्व जळुन निद्रेतुन व्हावा जागा हिन्दुस्थान ते तेज जगाला निःसंशय दिपवील ॥२॥ आसाम असो पंजाब असो बंगाल तो महराष्ट्र वा कर्नाटक तामिळ हा अखन्ड भारत परि आसेतु हिमाचल विविधतेतुनि एकता इथे प्रकटेल ॥३॥ हा समाज आपुला ध्येयापासुनि ढळला हिन्दूच हिन्दुच्या विरोधात उठलेला परकीय शक्तिचा स्वार्थी हस्तक बनला कष्टाने आमुच्या देशभक्त होइल ॥४॥ राष्ट्राचा करण्या घात कुणी धजतील परकीय शक्तिला साथ कुणी देतील बलदण्ड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देतील हा संघ शक्तिचा साक्षात्कार घडेल ॥५॥

स्वतंत्रता के 74 साल!

इमेज
     स्वतंत्रता के 74 साल फिर भी कुछ चीजों में बदलाव की आवश्यकता है. चाहे युवाओं की रोजगार की बात हो, महिलाओं की सुरक्षा की बात हो, किसानों के फसल की कीमत की बात हो. आज देश स्वतंत्रता के ७४ साल मना रहा है, लेकिन क्या सच में देश पुरी तरह से आझाद हुआ है?  दिन भर दिन देश की आबादी बढ़ रही है, हर साल करोड़ों युवा डिग्री लेकर निकल रहे हैं,लेकिन क्या उन सबको रोजगार मिलता है? लेकिन क्या सरकार उन्हें दुसरा कोई विकल्प चुनने के लिए मदद कर रही है, अगर बना भी रही है तो क्या वो सचमुच उन लोगो तक पहुँच पाती है?  दुसरी किसानों की बात करे तो, जो किसान सत्तर साल से अपनी मेहनत करके पूरे देश की भूक मिटाता है, लेकिन वो आज भी गरीब ही गरीब रह गया. क्यों उनके बच्चे अच्छी शिक्षा नहीं ले पा रहे है? क्यों किसान नहीं चाहता की उसका बेटा खेती करें. क्योंकि उन्हें पता है यहाँ सिर्फ काम करके पेट ही भर सकते हैं अच्छी जिंदगी नहीं जी सकते. हर साल लाखों किसान आत्महत्या करते हैं क्योंकि वो लिया हुआ कर्जा भी चुका नहीं पाते. ऐसा नहीं की वो आत्मनिर्भर नहीं बनना चाहता, लेकिन उनके फसल की बाजार में कोई की...